st employees | हक्काच्या पैशांसाठी मदतीची याचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

सोलापूर : हक्काच्या पैशांसाठी मदतीची याचना

सोलापूर : ऐन तारुण्यात, उमेदीत एसटी महामंडळात नोकरी लागल्याचा आनंद झाला खरा, पण सेवानिवृत्ती झाली तशी हीच नोकरी उतारवयात वेदनादायी ठरेल असे वाटले नाही. जवळपास तीस वर्षे सेवा केल्यानंतर हक्काचे, कष्टाचे पैसे मागण्यासाठी त्यांना केविलवाणे होऊन अधिकाऱ्यांना विनवणी करावी लागत आहे. शारीरिक, कौटुंबिक वेदना जाणून घेण्याऐवजी त्यांना अपमानित करून पाठविले जात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे बेजार झालेल्या सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या या वेदना आहेत.

हेही वाचा: वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भातील मेसेज फेक , महावितरणचे आवाहन

सेवानिवृत्त झाल्यामुळे छोट्या- छोट्या नोकऱ्या मिळत नाहीत. पेन्शन म्हणावी तर जेमतेम. त्यातील अर्धे पैसे औषधाला जातात. उरलेल्या पैशात घर चालवायचे म्हणजे इतर खर्च भागत नाही. आपल्या हक्काचे रजेची रक्कम द्या म्हणून विनवणी करावी तर अधिकारी दारात उभे करून घेत नाहीत अशी केविलवाणी अवस्था राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नशिबी आली आहे. एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंडाची, ग्रॅज्युटीची रक्कम, हक्काच्या रजेचे पगार दिला जातो. मात्र जुलै 2019 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्याप त्यांच्या हक्काच्या रजेचे पैसे मिळाले नाहीत. केवळ फंडाची, ग्रॅज्युटीची रक्कम मिळाली पण त्यातून कोणी घर बांधले, कोणी मुलांची लग्न केली. मिळालेली रक्कम हातोहात संपली, आता घर कसे चालवायचे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. रजेचा पगार मिळाला तर त्याच्या व्याजातून काही प्रमाणात घरखर्च भागणार आहे. पण ही रक्कम मिळण्यात अडचण ठरली आहे. याबाबतीत विभाग नियंत्रक, कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा: अकोला: ज्वारी उपेक्षितच; हमीभावापेक्षा निम्माही भाव मिळेना

गरज पाहून रक्कम

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे देणे शक्‍य नाही. तर दुसरीकडे जुलै 2019 पासून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अडचणीत आल्याने त्यांचे जगणे मुश्‍कील झाले आहे. मागील दोन वर्षांपासून त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत. एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पाच कोटी द्यायचे आहेत. कर्मचाऱ्यांचे आजारपण व कर्मचाऱ्यांची गरज पाहून रक्कम दिली जात असल्याचे यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सेवानिवृत्त कर्मचारी संख्या

  • चालक - 50

  • वाहक - 25

  • प्रशासकीय - 38

  • कार्यशाळा - 27

Web Title: Request For Help For The Right Money

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top