गादेगाव, सुपली, वाखरी, भंडीशेगावातील सरपंचपदाचे आरक्षण बदलले ! अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarpanc

नव्याने काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या सोडतीमध्ये गादेगाव, सुपली, वाखरी, नारायण चिंचोली, भंडीशेगाव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीमध्ये बदल झाले आहेत तर अनुसूचित जमातीसाठीचे तारापूर (पुरुष), रोपळे, शेगाव दुमाला या तीन ग्रामपंचायतींसाठीचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहे. 

गादेगाव, सुपली, वाखरी, भंडीशेगावातील सरपंचपदाचे आरक्षण बदलले ! अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम 

पंढरपूर (सोलापूर) : नव्याने काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या सोडतीमध्ये गादेगाव, सुपली, वाखरी, नारायण चिंचोली, भंडीशेगाव या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीमध्ये बदल झाले आहेत तर अनुसूचित जमातीसाठीचे तारापूर (पुरुष), रोपळे, शेगाव दुमाला या तीन ग्रामपंचायतींसाठीचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहे. 

येथील प्रांताधिकारी गजनान गुरव आणि तहसीलदार सुशील बेल्लेकर यांच्या उपस्थितीत पंढरपूर तालुक्‍यातील 91 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्‍यात पुन्हा नव्याने सरपंचपदाची सोडत काढण्यात आली. सोडतीमध्ये गादेगाव, सुपली, वाखरी, नारायणचिंचोली, भंडीशेगाव येथे बदल झाले आहेत. गादेगाव येथे पूर्वीच्या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाले होते. सोमवारच्या सोडतीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निघाले आहे. सुपली येथे पूर्वी ओबीसीसाठीचे आरक्षण होते. त्यामध्ये बदल होऊन सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण निघाले आहे. 

तर नारायण चिंचोली व भंडीशेगाव येथे पूर्वी अनुसूचित जातीसाठी आरक्षण होते. नव्याने काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये नारायण चिंचोलीचे सरपंचपद हे ओबीसीसाठी तर भंडीशेगावचे सरपंचपद महिलेसाठी खुले झाले आहे. वाखरीत अनुसूचित जातीसाठीचे आरक्षण होते. त्यामध्ये बदल होऊन सरपंचपद खुले झाले आहे. या फेर सोडतीकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडतीसाठी मोठी गर्दी झाली होती. 

आरक्षण पुढीलप्रमाणे... 

  • अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेली गावे : पोहरगाव, सुगावखुर्द, खरसोळी, पळशी, चळे, मेंढापूर, सुस्ते, आंबेचिंचोली, सोनके, बार्डी 
  • अनुसूचित जाती महिला : पुळूजवाडी, शेंडगेवाडी, आव्हे- तरटगाव, उंबरगाव, भटुंबरे, नेपतगाव, शिरढोण, शेवते, कोंढारकी, तिसंगी 
  • ओबीसी : जाधववाडी, लोणारवाडी, शिरगाव, आढीव, नारायण चिंचोली, खरातवाडी, गोपाळपूर, कोर्टी, ईश्वरवठार, बोहाळी, उपरी, नांदोरे, करकंब 
  • ओबीसी महिला : अजोती, पांढरेवाडी, तनाळी, जैनवाडी, केसकरवाडी, खेडभोसे, चिंचोली भोसे, गार्डी , शंकरगाव, नेमतवाडी, पिराचीकुरोली, व्होळे 
  • सर्वसाधारण : कान्हापुरी, करोळे, सांगवी- बादलकोट, पटवर्धनकुरोली, वाडीकुरोली, भोसे, देवडे, चिलाईवाडी, गुरसाळे, खेडभाळवणी, धोंडेवाडी, भाळवणी, टाकळी, अजनसोंड, बिटरगाव, मुंढेवाडी, अनवली, फुलचिंचोली, पुळूज, सरकोली, उजनी वसाहत, तावशी, मगरवाडी 
  • सर्वसाधारण महिला : उंबरे, जळोली, पेहे, सुगाव भोसे, शेळवे, भंडीशेगाव, कौठाळी, वाखरी, गादेगाव, बाभूळगाव, देगाव, रांझणी, सिद्धेवाडी, एकलासपूर, कासेगाव, खर्डी, शेटफळ, आंबे, विटे, ओझेवाडी, टाकळी गुरसाळे, सुपली, तुंगत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Web Title: Reservation Sarpanch Post Pandharpur Taluka Has Been

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ShegaonBabhulgaonLonar
go to top