
सांगोला : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पकडलेला टेम्पो घेऊन जाताना, महसूलच्या पथकास दमदाटी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आगलावेवाडी (ता. सांगोला) येथील गावकामगार तलाठी दिग्विजय विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र अर्जुन आगलावे (रा. आगलावेवाडी) याच्यासह टेम्पो चालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.