
सोलापूर : सातबाऱ्यावर असलेल्या मयताच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरण यासह अनेक प्रकरणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. सातबाऱ्यावरील ही अडचण दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभाग - १०० दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत १ एप्रिलपासून राज्यात ‘जिवंत सातबारा मोहीम जाहीर केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १ मार्चपासून सुरू असलेली जिवंत सातबारा मोहीम आता राज्यभर राबविली जाणार आहे.