

सोलापूर : महापालिका हद्दीत गुंठेवारी पद्धत बंद करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील सर्व बांधकामे ठप्प होती. याबाबत मोजणी करून गुंठेवारी नियमित करण्यात यावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला आमदार विजय देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी उपस्थित होते.