
सोलापूर : कृत्रिम प्रजनन प्रक्रियेतून राजस्थानात ४० माळढोक पक्षी जन्मले आहेत. यातील दुसऱ्या पिढीतील ८ माळढोक पक्षी तीन वर्षांनी सोलापूरच्या नान्नज अभयारण्यात आणण्यात येणार आहे. याची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली अाहे. यासाठी अभयारण्याची क्षेत्र मर्यादा वाढणार नाही आणि कोणतेही नवीन निर्बंध येणार नाहीत. वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली.