स्वयंपाकघराला महागाईचा ठसका! गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल

स्वयंपाकघराला महागाईच्या फोडणीचा ठसका! गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल
स्वयंपाकघराला महागाईच्या फोडणीचा ठसका! गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल
स्वयंपाकघराला महागाईच्या फोडणीचा ठसका! गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिलCanva
Summary

विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत पंचवीस रुपयांनी वाढ झाल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील स्वयंपाकघरांमध्ये महागाईच्या फोडणीचा ठसका बसला आहे.

वाळूज (सोलापूर) : विनाअनुदानित (Unsubsidized) गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किमतीत पंचवीस रुपयांनी वाढ झाल्याने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील स्वयंपाकघरांमध्ये महागाईच्या फोडणीचा ठसका बसला आहे. कोरानामुळे (Covid-19) नोकरी गेलेल्यांचे तसेच शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी (Farmers) आणि मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित गॅस दरवाढीमुळे बिघडले आहे.

स्वयंपाकघराला महागाईच्या फोडणीचा ठसका! गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल
मामांचे हात धरून 'वंचित'चे दादा राष्ट्रवादीच्या वाटेवर !

केंद्र शासनाने सुरवातीला आर्थिक दुर्बल कुटुंबांना विविध आमिषे दाखवून गॅस कनेक्‍शन दिले खरे; मात्र गॅसच्या किमती महिना - दोन महिन्याला वाढवून आणि गॅसवरील सबसिडी बंद करून त्यांचे कंबरडेच मोडले आहे. गॅस असणाऱ्या कुटुंबांना रेशनवर मिळणारे रॉकेलही बंद केले आहे. त्यामुळे चूल आणि स्टोव्ह अडगळीत गेले आहेत. स्वयंपाकासाठी गॅसशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती सर्वत्र झाली आहे. गॅसच्या किमतीत प्रति सिलिंडर 25 रुपये एवढी घसघशीत वाढ केल्याने स्वयंपाकघराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या वाढीमुळे मोहोळ येथे 834.50 रुपयांना मिळणारा 14.2 किलोचा गॅस सिलिंडर आता 859.50 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एक जुलैलाच सिलिंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढविण्यात आले होते. गेल्या आठ महिन्यांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये 168 रुपयांनी वाढ झाली आहे.

स्वयंपाकघराला महागाईच्या फोडणीचा ठसका! गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल
अफगाणिस्तानवरील तालिबानी वर्चस्वामुळे केळी निर्यातीवर परिणाम

स्वयंपाकासाठी पारंपरिक लाकूड, रॉकेल या ऊर्जास्रोतांचा वापर करणे टाळा व अपारंपरिक स्रोताचा म्हणजेच स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करा म्हणून केंद्र शासन जाहिरात करते. आणि महिन्याला 25 रुपयांनी गॅस सिलिंडरची किंमत वाढवते. हे म्हणजे "तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार' असेच झाले आहे.

- मेघा संदीप आतकरे, देगाव (वा), ता. मोहोळ

केंद्र शासन गॅसच्या किंमती दर महिन्याला 25 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना गॅस परवडत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांनी आता पुन्हा चुली पेटवायला सुरवात केली आहे. शासनाने गॅसच्या किमती कमी कराव्यात.

- अर्चना अनिल कादे, पोलिस पाटील, वाळूज (दे), ता. मोहोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com