Fight Against Death Fails : जखमी ऋतुजाची मृत्यूशी झुंज अपयशी; वैराग शहरात हळहळ व्यक्त
Solapur News : हिंगणी रोडवर उसाच्या मळीने भरलेला ट्रक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये ऋतुजा हिच्या उजव्या पायाच्या मांडीला गंभीर जखम झाली, तिचा डावा कान तुटला व डोक्याला गंभीर मार लागला होता.
The community in Vairag mourns the tragic loss of Rituja, who succumbed to injuries after a valiant fight against death.Sakal
वैराग : वैराग येथे पंधरा दिवसांपूर्वी ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ऋतुजाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. तिचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूमुळे वैराग शहरात हळहळ व्यक्त होत आहे.