सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पो ला एका पिकअप जीपने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारात शुक्रवार ता 13 मे रोजी पहाटे पाच वाजता झाला. रिजवान अब्दुल अजीज शेख वय 22 रा वैजापूर (औरंगाबाद) व रिहान फैजल वय 35 रा झारखंड अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार,आयशर टेम्पो क्रमांक एम एच 43/ बी आर 5252 हा कल्याण येथून घरगुती सामान घेऊन सोलापूर कडे निघाला होता. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालकाने टेम्पो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला उभा करून चहा पिण्यासाठी गेला होता. चहा पिऊन परत येत असताना जोराचा आवाज झाला .

आवाज कशाचा आला हे पाहण्यासाठी जवळ गेला असता आयशर ला पाठीमागून पीक अप क्रमांक एम एच 20 ईसी 7282 हिने जोराची धडक मारली, त्यात केबिन मध्ये बसलेल्या वरील दोघांना मार लागून ते गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावले, तर अन्य दोघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी सोलापूरला पाठविलेया अपघाताची खबर चेतन बिभीषण खंदारे वय 27 रा नरखेड याने मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार जे एन पवार करीत आहेत.

Web Title: Road Accident Solapur Pune National

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top