
सोलापूर : मुलीसह दुचाकीवरून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अनोळखी दुचाकीस्वाराने लंपास केल्याची घटना ६ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मडकी वस्ती परिसरात घडली आहे. दुसरीकडे शांती चौकातून अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण देखील दुचाकीस्वाराने हिसकावले आहे. दोन्ही घटनांमधील संशयित एकच आहेत, पण त्यांनी वाटेत कपडे बदलले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.