
सोलापूर : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू लागू नये, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश मिळण्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात ७ समतादूतांची नियुक्ती केली आहे. ते विद्यार्थ्यांच्या पालकांना मदत करीत आहेत.