सोलंकरवाडीत बिबट्याची दहशत ! मात्र "तो' तरस असल्याचा वनविभागाचा खुलासा 

Wild Animals
Wild Animals
Updated on

मोडनिंब (सोलापूर) : येथील शेतकरी अर्जुन भांगिरे व गोरख भांगिरे हे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले असता अर्जुन भांगिरे यांना डाळिंबाच्या बागेत बॅटरीच्या प्रकाशात बिबट्यासृदश प्राणी दिसला. त्यांनी भाऊ गोरख यास हाक मारून जागे केले. वारंवार बिबट्याच्या अस्तित्वाच्या अफवा उठत असल्याने "त्या' दोघांनी त्या प्राण्यास बिबट्या समजून भीतीने शेतातून काढता पाय घेतला व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे बिबट्या शेतात आल्याची माहिती दिली. 

रात्रीच्या वेळी आसपासच्या शेतकऱ्यांनी बिबट्या शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो प्राणी दिसला नाही. दरम्यान, सकाळी मोहोळ वनविभागाचे वनरक्षक कुर्ले व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसे शोधले असता तो प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे सिद्ध झाले. रात्री खंडित होणारा विद्युत पुरवठा, उन्हाळ्यामुळे पिकास लागणारी पाण्याची गरज, अशातच आता वन्य प्राण्यांची चाहूल शेतकऱ्यांच्या भीतीत भर घालत आहे. मात्र सोलंकरवाडी (ता. माढा) शिवारात तरसाचा वावर असल्याचे आढळून आले आहे. 

सोलंकरवाडी परिसरात आढळलेला प्राणी हा तरस आहे. त्याचे पुढचे पाय लहान व मागचे पाय मोठे असतात. तो अतिशय भेकड प्राणी आहे. जंगलाचा सफाई कामगार म्हणून तो काम करतो. तो माणसावर हल्ला करत नाही. मेलेल्या कोंबड्या, मासे याच्या वासाने तो मानवी वस्तीच्या आसपास येऊ शकतो. यापूर्वीही लऊळ, कुर्डुवाडी, उपळवटे परिसरात तरसाचा वावर आढळून आलेला आहे. 
- ज्ञानेश्‍वर साळुंखे, 
वन परिमंडळ अधिकारी, मोहोळ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com