Siddhapur Dam
sakal
मंगळवेढा - भीमा नदीवर सिद्धापूर- वडापूर बंधाऱ्यावरील गळती रोखण्यासाठी शासनाने 58 कोटीची तरतूद बॅरेजसाठी केल्याने पाणी गळती बंद होऊन याचा शेतकऱ्याला फायदा होणार असला तरी वाढत्या सिंचन क्षेत्राचा विचार करता बंधाऱ्याची उंची वाढण्याची मागणी देखील या निमित्ताने समोर येत आहे.
भीमा नदीवर सिद्धापूर वडापूर येथे बंधारा असून, उजनी व वीर धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर भीमा नदीला पूर आल्यानंतर बंधाऱ्याचे धोक्यापासून संरक्षण व्हावे, म्हणून बंधाऱ्याची दारे काढली जातात आणि पाणी ओसरल्यानंतर पुन्हा पूर्ववत ठेवली जातात. त्यामुळे बंधाऱ्यात जवळपास जो पाणीसाठा होतो. त्यातील काही पाणीसाठा गळतीतून वाया जात आहे.