सोलापूर : प्रमुख सहा महामार्गांवरून प्रवास होणार सुखकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Highway
सोलापूर : प्रमुख सहा महामार्गांवरून प्रवास होणार सुखकर

सोलापूर : प्रमुख सहा महामार्गांवरून प्रवास होणार सुखकर

सोलापूर : जिल्ह्यातून जाणाऱ्या सहा प्रमुख महामार्गाचे काम डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण होणार असून प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. सोलापूरकरांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. महत्वाकांशी प्रमुख सहा प्रकल्प डिसेंबरपर्यंत खुले होणार असल्याने सोलापूरकरांसाठी आणि भाविकांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. विशेष म्हणजे, पालखी महामार्गाच्या भूसंपादनाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे.

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महार्गाचे काम सातारा, पुणे, सोलापूर या तीन टप्प्यात सुरु आहे. यातील सातारा आणि पुणे महामार्गापैकी सोलापूर महामार्ग प्रकल्पाच्या वतीने वेगाने काम सुरु आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलगंणाच्यादृष्टीने महत्वाचा असणाऱ्या सोलापूर-हैदराबाद महामार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. सोलापूर-विजयपूर ११० किमीपैकी ३ किमीचे काम अपूर्ण, सोलापूर-हैदराबाद १०० किमीपैकी १३ किमीचे काम अपूर्ण तर, सोलापूर- सांगली १५० पैकी ७ किमीचे काम अपूर्ण आणि सोलापूर-अक्‍कलकोट ३८ किमीपैकी ३ किमीचे काम अपूर्ण आहे. त्याचबरोबर सोलापूर- विजयपूर, सोलापूर- अक्‍कलकोट आणि सोलापूर- सांगली महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे यावेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात

  1. सोलापूर- हैदराबाद महामार्ग : एकूण लांबी १००.६ किमी, छोटे पूल २८, मोऱ्या व पाईपमोऱ्या ११८, मोठे व छोटी संगमस्थाने १९, प्रवासी बसथांबे ३२

  2. सोलापूर - विजयपूर महामार्ग : एकूण लांबी ११०.५४२ किमी, मोठे पूल ३, छोटे पूल ३, मोऱ्या व पाईपमोऱ्या १७०, उड्डाणपूल ६, रेल्वे उड्डाणपूल २, बाह्यवळणमार्ग २१ किमी, मोठे व छोटी संगमस्थानके ५०, प्रवासी बसथांबे २४.

  3. अक्‍कलकोट- सोलापूर महामार्ग : एकूण लांबी ३८.९५२ किमी, मोठे पूल १, छोटे पूल ६, मोऱ्या व पाईपमोऱ्या ३७, उड्डाणपूल ७, वाहन भुयारी मार्ग ६, पादचारी भुयारी मार्ग १, बाह्यवळण ७ किमी, मोठे व छोटी संगमस्थानके १८, प्रवासी बसथांबे १८

  4. मंगळवेढा- सोलापूर महामार्ग : एकूण लांबी ५६.५०० किमी, मोठे पूल २, छोटे पूल १, मोऱ्या व पाईपमोऱ्या १०४, रेल्वेउड्डाणपूल १, प्रवासी बसथांबे ३८, विश्रांती क्षेत्र १

  5. वाटंबरे - मंगळवेढा महामार्ग : एकूण लांबी ४५.६०० किमी, मोठे पूल २, छोटे पूल ६, मोऱ्या व पाईपमोऱ्या ७२, रेल्वेउड्डाणपुल १, प्रवासी बसथांबे ३४, विश्रांती क्षेत्र १

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top