"सहकारमहर्षी'च्या सात लाख 51 हजार पोती साखरेचे पूजन !

Sahakarmaharshi
Sahakarmaharshi
Updated on

अकलूज (सोलापूर) : सहकार महर्षी कारखान्याच्या 7 लाख 51 हजार साखर पोत्याचे पूजन संचालक रावसाहेब पराडे यांच्या हस्ते तर सहवीज निर्मिती प्रकल्पातील 4 कोटी वीज युनिटचे पूजन कारखान्याचे संचालक विजयकुमार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

सहकार महर्षी कारखान्याचा सीझन 2020-21 चा ऊस गळीत हंगाम सोमवारी (26 ऑक्‍टोबर) सुरू झाला होता. सोमवार (25 जानेवारी) अखेर 7 लाख 29 हजार 890 मे. टन उसाचे गाळप होऊन 7 लाख 54 हजार साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.51 टक्के व आजचा साखर उतारा 11.54 टक्के आहे. सध्या प्रतिदिन 8 हजार मे. टनप्रमाणे उसाचे गाळप होत आहे. तसेच बगॅसवर आधारित 33 मेगावॉट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून आतापर्यंत 6 कोटी 41 लाख 89 हजार 531 युनिट वीज निर्माण होऊन 4 कोटी 18 हजार 560 युनिट वीज एक्‍स्पोर्ट (विक्री) केलेली आहे. डिस्टिलरी प्रकल्पामध्ये 64 लाख 73 हजार 118 लिटर्स रेक्‍टिफाईड स्पिरीट तसेच 48 लाख 29 हजार 741 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले आहे. तसेच ऍसेटिक ऍसिडमध्ये 713 मे. टन ऍसिटाल्डिहाईड व 763 मे. टन ऍसिटीक ऍसिडची निर्मिती झाली असून, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतिपथावर वाटचाल करीत असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. 

या वेळी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नामदेव ठवरे, धनंजय चव्हाण, विजय माने - देशमुख, रावसाहेब मगर, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विश्वास काळकुटे, चांगदेव घोगरे, भारत फुले, भीमराव काळे, धनंजय एकतपुरे, भीमराव रेडे, अनिल कोकाटे, नामदेव चव्हाण, नितीन निंबाळकर, मारुती घोडके, दिलीप घुले, खाते प्रमुख, कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com