
करमाळा: अवघं वय होतं १६ वर्षं. शिक्षणात हुशार, शांत स्वभावाची आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवायची जिद्द असलेली श्रावणी राहुल लिमकर. तिचं एक स्वप्न होतं गड सर करण्याचं. ती जिद्दीनं सज्जनगडावर गेली. हृदयाच्या जन्मजात त्रासाचं ओझं अंगावर असतानाही तिनं गड सर केला. पण नियतीनं वेगळंच लिहून ठेवलं होतं...