

Pandharpur 10th Board Result
esakal
पंढरपूर: वडील गवंडी काम करतात...आई वडीलांना कामात मदत करते. दिवसभर काबाड कष्ट करायचे... स्वतः उन्हात तळपून दुसर्याला निवारा, सावली तयार करायची अशा एका गवंड्याच्या लेकीने दहावी बोर्ड परीक्षेत 83 टक्के गुण मिळवून परिसरात डंका पिटला आहे. उपरी (ता.पंढरपूर) येथील विलासराव देशमुख विद्यालयात तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे आठरा विश्व दारिद्रय असलेल्या कुटुंबातून दहा बाय दहा च्या एका खोलीत राहून तिने हे उज्ज्वल यश खेचून आणले आहे. साक्षी रघुनाथ वाघमारे असे या जिद्दी आणि मेहनती मुलीचे नाव आहे.