
सोलापूर : जिल्ह्यातील उचेठाण आणि तारापूरसह एकूण १५ वाळू ठेक्यांच्या लिलावाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. लिलाव होणाऱ्या ठेक्यावरील एकूण वाळूपैकी १० टक्के वाळू बेघर लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी मोफत मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या ४५ हजार घरकुलांची बांधकामे सुरू असून त्या सर्वांना नोंदणी केल्यावर प्रत्येकी पाच ब्रास वाळू दिली जाणार आहे.