Sangola Bribery Case : एसीबीचा मोठा दणका! सांगोल्यात लेडी ऑफिसरच्या सांगण्यावरून ड्रायव्हरने घेतली 7 हजारांची लाच; सातबारावर नाव चढवण्यासाठी मागितले पैसे

ACB Traps Driver Taking ₹7,000 Bribe in Sangola : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात ACB ने सापळा रचून मंडलाधिकाऱ्याच्या खासगी चालकाला सातबारा नोंदीसाठी ७ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
acb trap sangola revenue officer driver

acb trap sangola revenue officer driver

esakal

Updated on

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. ५) सापळा रचून मंडलाधिकाऱ्याच्या खासगी चालकाला ७ हजारांची (Sangola Bribery Case ACB Trap) लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मंडलाधिकारी विजया नाईक (रा. इसबावी, ता. पंढरपूर) व त्यांचा खासगी चालक वैभव मोरे (रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा (acb trap sangola revenue officer driver) दाखल झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com