
सांगोला : तालुक्यात २०२३ च्या खरीप हंगामामध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी सांगोला तालुक्यातील ७६ हजार ९५८ शेतकऱ्यांना १५७ कोटी सात लाख ६७ हजारांचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली होती. त्यातील ७५ हजार ९४६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११६ कोटी ९६ लाख २९ हजार ०५३ रुपयांचा दुष्काळनिधी जमा केल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.