.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
A 32-year-old man was shot in a car near Tippehalli Canal in Sangola.
esakal
सांगोला, : सांगोला येथून किडेबिसरीकडे जात असताना तिप्पेहळ्ळी येथील कॅनॉलजवळ मोटारीचा वेग कमी होताच मागील सीटवर बसलेल्या व्यक्तींनी तरुणाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला. ही घटना मंगळवारी (ता. २७) पहाटे घडली. प्रतापसिंह ऊर्फ गब्बर ज्ञानू करचे (वय ३२, रा. पाचेगाव बुद्रूक, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सांगोला पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.