Chetansinh Kedar Sawant
sakal
सांगोला - दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पंढरपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चावरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हा मोर्चा जनहिताच्या प्रश्नांसाठी नसून पक्षाचे अस्तित्व दाखविण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेली ‘स्टंटबाजी’ असल्याची टीका माजी जिल्हाध्यक्ष तथा सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी केली.