Sharad Pawar : सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील माणसांत रुजलेत

आपल्या कष्टाने दुष्काळावर मात करून सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील लोकांमध्ये आहे. माणदेशी माणसाला कर्तृत्व सिद्ध करतांना निसर्गही अडवू शकत नाही.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Summary

आपल्या कष्टाने दुष्काळावर मात करून सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील लोकांमध्ये आहे. माणदेशी माणसाला कर्तृत्व सिद्ध करतांना निसर्गही अडवू शकत नाही.

सांगोला - आपल्या कष्टाने दुष्काळावर मात करून सन्मानाने जगण्याचे संस्कार माणदेशातील लोकांमध्ये आहे. माणदेशी माणसाला कर्तृत्व सिद्ध करतांना निसर्गही अडवू शकत नाही. कष्ट करून जगण्याची भूमिका येथील माणदेशी लोकांमध्ये असल्याने या भागाची ओळख देशातच नव्हे तर जगभरात पसरली असल्याचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'माझी वाटचाल' या आत्मचरित्र व गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सपत्नीक सत्कार देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवार (ता. 8) रोजी करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते. यावेळी बाबुराव गायकवाड यांना चांदीची प्रतिकृती असलेली बैलगाडी आणि चांदीचा श्रीकृष्णाचा रथ भेट देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी गौरव समितीचे अध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, स्वागताध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार विनायक पाटील, माजी आमदार राम साळे, माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, शिवाजीराव काळंगे, पद्मजादेवी मोहिते-पाटील, कविता म्हेत्रे, पी. सी. झपके, राहुल शहा, दादासाहेब रोंगे, सचिन देशमुख, प्रभाकर चांदणे, प्रा. नानासाहेब लिगाडे, डॉ. पियूष साळुंखे पाटील, तानाजी पाटील, डॉ. प्रभाकर माळी, मारुती बनकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार बाबुराव गायकवाड यांच्या विषयी बोलताना म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि सामान्य कुटुंबात जन्म घेऊन बाबुराव गायकवाड यांनी सहकार शिक्षण समाजकारण आणि राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन ते गेली 45 वर्षे माझ्यासोबत काम करत आहेत. आजच्या तरुणांनी आपल्या क्षेत्रात काम करत असताना बाबुराव गायकवाड यांच्यासारख्या ज्येष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.

प्रास्ताविक करताना माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील म्हणाले, ग्रामीण भागात जन्माला आलेल्या भाऊंनी ग्रामसेवकाची नोकरी स्वीकारली. त्यानंतर ग्रामसेवकाच्या नोकरीचा राजीनामा देवून पवारांच्या नेतृत्वाखाली राजकीय वाटचाल सुरु ठेवली असल्याचे सांगितले.

सत्कारमूर्ती बाबुराव गायकवाड म्हणाले, पवार साहेब आले तरच अमृतमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मी स्पष्टवक्ता असल्याने माझं जीवन संघर्षमय झालं आहे. 1985 साली एस. काँग्रेसचा अध्यक्ष झालो. त्यावेळी मी विधानसभेची उमेदवारी मागितली होती, पण पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शहाजीबापूचा प्रचार केला. देशाला आज पवार साहेबांची गरज हे त्यांनी देशातील विरोधकांची मोट बांधून देशाचे नेतृत्व करावे असें सांगितले.

दहा वर्षानंतर पवार साहेबांजवळ बसण्याची संधी मिळाला - आ. शहाजी पाटील

शहाजीबापू पाटील म्हणाले की, बाबुरावभाऊ आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. 1995 रोजी खासदार शरद पवार यांचा आदेश मानून मला पाठींबा दिला आणि माझा पहिला विजय मिळाला 2019 च्या निवडणुकीतही भाऊंनी पाठींबा दिला तेंव्हाच मी पुन्हा आमदार झालो. संपूर्ण तालुक्याच्या राजकारणात गेल्या 50 वर्षांत मला अनेक माणसं पारखता आली.

पण, दिलेल्या शब्दाला पक्का राहणारा माणूस म्हणून बाबूराव गायकवाड यांचा उल्लेख आपल्याला करावाच लागतो. साहेब, बाबूराव गायकवाड हे नाव माझ्यासाठी नगदी नाणं आहे. सांगोला तालुक्याचे आणि बारामतीचे एक वेगळे नाते आहे. भाऊंच्या कार्यक्रमामुळे दहा वर्षानंतर मला पवार साहेबांजवळ बसण्याची संधी मिळाली, त्यांचे दर्शन मिळाले हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस असल्याचे आमदाा शहाजी बापूंनी सांगितले.

आमदार शहाजी पाटील झाले भावुक

पवार कुटुंबावर नेहमी टीका करणारे आमदार शहाजी पाटील आज म्हणाले की, मी आज सकाळी अंघोळ करताना भावनिक झालो होतो. सुमारे दहा वर्षांनी मला आज साहेबांचं जवळून दर्शन होणार होतं. हा योग बाबूराव गायकवाड यांनी घडवून आणला होता. त्यांचेही माझ्यावर उपकार आहेत. काही व्यक्ती अशा असतात, त्यांना पाहिलं तरी जीवनात एक जिद्द, विचारधारा निर्माण होते. आज त्या रुपाने साहेबांचं दर्शन झालं आहे. त्यामुळे आज माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. सांगोला तालुक्यातील जनतेच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की, साहेबांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com