Madha News : २४ किलो वजनाच्या संस्कृती टोणपेने २८ किलो वजनी गटाचे मैदान गाजवले! शिराळच्या मातीने राष्ट्रीय कुराशमध्ये लिहिला ‘दंगल’चा नवा अध्याय

National Kurash Championship Sanskriti Tonpe : माढा तालुक्यातील शिराळ गावच्या संस्कृती सदाशिव टोणपे हिने २४ किलो वजन असूनही २८ किलो गटात खेळत राष्ट्रीय सब ज्युनियर कुराश स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळवला.
National Kurash Championship Sanskriti Tonpe

National Kurash Championship Sanskriti Tonpe

esakal

Updated on

कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील शिराळ (मा.) या गावाने पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. शिराळ येथील संस्कृती सदाशिव टोणपे या उदयोन्मुख पैलवान कन्येने पंजाबमधील लुधियाना येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील सब ज्युनियर नॅशनल कुराश स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळवून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विशेष बाब म्हणजे, संस्कृतीचे स्वतःचे वजन अवघे २४ किलो असतानाही तिने थेट २८ किलो वजन गटात खेळून ही विशेष कामगिरी करून दाखवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com