Sant Chokhamela : संत चोखामेळाचा 7 मे ते 10 मे दरम्यान 685 वा स्मृतीदिन सोहळा

दामाजी पंतापासून ते संत चोखामेळा समाधीपर्यंत ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा सोहळ्याने या पुण्यतिथी सोहळयास प्रारंभ
Sant Chokhamela Information In Marathi 685th Ceremony solapur
Sant Chokhamela Information In Marathi 685th Ceremony solapursakal
Updated on

मंगळवेढा : संत चोखामेळा यांच्या 685 व्या स्मृतीदिन सोहळयानिमित्त 7-10 मे दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष जयराज शेंबडे यांनी दिली उदया रविवारी दि. 7 मे रोजी दामाजी पंतापासून ते संत चोखामेळा समाधीपर्यंत ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा सोहळ्याने या पुण्यतिथी सोहळयास प्रारंभ होत आहे.

स. 10 वा.नामदेवरायाचे सोळावे वंशज ह.भ.प.माधव महाराज रामदास यांच्या हस्ते विणा पूजन होणार आहे.स.11 ते 5 यादरम्यान भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे यासाठी 15 हजार,10 हजार,5 हजार व स्मृतीचिन्हे अशी बक्षीसे ठेवण्यात आली,स्पर्धेचे उदघाटन भगीरथ भालके यांच्या हस्ते सिध्देश्वर आवताडे यांच्या अध्यक्षेतेखाली होणार आहे.

यावेळी गैबीपीर ऊरुस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड,चंद्रकांत काकडे,विक्रम शेंबडे आदी उपस्थित राहणार आहे.संध्या. 7 वा. विद्या प्रतिष्ठान बारामती येथील ह.भ.प. प्रा.राज कदम यांचे प्रवचनाचे उदघाटन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या होणार आहे,यावेळी गौरीशंकर बुरकूल,गोपाळ भगरे,शशीकांत चव्हाण,अरुण किल्लेदार,औदुबर वाडदेकर उपस्थित राहणार आहेत.

8 मे रोजी 9 ते 5 या वेळेत भव्य भजन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. संध्याकाळी 7 वा.जेजुरी येथील ह.ब.प.मनोज मोरे महाराज यांच्या किर्तनाचे उदघाटन भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते अजित जगताप यांच्या अध्यक्षेतेखाली होणार आहे यावेळी प्रवीण खवतोडे,मुरलीधर दत्तू,दिगंबर भगरे,अॅड दत्तात्रय खडतरे,बाबुराव राजमाने उपस्थित राहणार आहेत, 9 मे रोजी स 9 ते 4 पर्यंत महादेव यादव महाराज अरुण शिवशरण यांचे भजन होऊन तालुक्यातील सर्व भजनी मंडळे यांचे एकत्रित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

सायं. 5 वा. भजन स्पर्धेतील पारितोषिक वितरण विठठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते अॅड सुजित कदम यांच्या अध्यक्षेतेखाली होणार आहे यावेळी जयदिप रत्नपारखी,चंद्रकांत घुले,ज्ञानेश्वर कौडूभैरी,भारत ढोणे उपस्थित राहणार आहे.सायं 7 वा. ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांच्या कीर्तनाचे उदघाटन शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते र्अड नंदकुमार पवार यांच्या अध्यक्षेतेखाली होणार आहे यावेळी राहुल शहा,तानाजी खरात,अरुणा माळी,चंद्रकांत कौडूभैरी,मुझ्झफर काझी, आयोजित केले आहे.

दि 10 मे रोजी सकाळी 9 वा. संत चोखामेळा यांच्या समाधीस आ समाधान आवताडे यांच्या हस्ते समाधीस महाअभिषेक घातला जाणार यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर,उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,तहसीलदार मदन जाधव,मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,पोलीस निरीक्षक रणजित माने हे उपस्थित राहणार आहेत.दुपारी 12 वाजता निवृत्ती महाराज रामदास यांचे कीर्तन व समाधीस पुष्पवृष्टी होऊन या सोहळयाची सांगता होणार आहे.या सोहळयासाठी संत चोखामेळा समाधी ट्रस्ट आणि वारी परिवार हे परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com