
-दत्तात्रय खंडागळे
सांगोला : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. निवडणुका नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य, नगर परिषदांमधील नगराध्यक्ष, सदस्यच नसल्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत आमदारांनंतर थेट सरपंचांनाच विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.