
सोलापूर : मोटार रिवाइंडिंग करणाऱ्या सुनील पाटील यांनी मुलाबरोबरच मुलीलाही इंजिनिअर करण्याचे स्वप्न बाळगले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी ते मंगरुळे गाव सोडून सोलापूरला राहायला आले असून मुलाबरोबरच मुलीदेखील इंजिनिअर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांची मुलगी सायली पाटील हिला ८३. १७ टक्के गुण मिळाले आहेत. मूळचे बनजगोळ येथील सुनील पाटील यांचे अक्कलकोट येथे मोटार रिवाइंडिंगचे दुकान आहे. मुलगी सायली पाटील हिने संगमेश्वर महाविद्यालयातून बारावी शास्त्र शाखेत ८३.१७ टक्के गुण घेतले आहेत. तर मुलगा शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकतो आहे.