Scorpio Crushed in Collision with Container Truck
sakal
टेंभुर्णी - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सापटणे (टें) गावच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओने टिपरला ओव्हरटेक करताना पुढील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक तरूण ठार तर दोघे तरूण गंभीर जखमी झाले.सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातातील वाहनाची धडक एवढी जबरदस्त होती की स्कार्पिओचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. अपघातातील मयत तरूण व जखमी तरूण हे मोहोळ येथील रहीवाशी आहेत.