डिकीतील दीड लाखांची रोकड पाहून चोरट्याने दुचाकीच पळविली

3two_20wheeler_20chor.jpg
3two_20wheeler_20chor.jpg

सोलापूर : महापालिकेतून जन्म- मृत्यू दाखला काढण्याच्या निमित्ताने राजू चंद्रशा वेळेनवरू (रा. सनत नगर, रामवाडी) हे महापालिकेत गेले होते. त्यावेळी आयुक्त कार्यालयाच्या बाजूला असलेल्या पोस्टबॉक्‍सजवळ त्यांनी दुचाकी पार्क केली. त्यानंतर ते संबधित कार्यालयाकडे गेले. त्यावेळी चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतील दीड लाखांच्या रोकडसह बनावट चावी वापरुन दुचाकीच लंपास केली. या प्रकरणी वेळेनवरू यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दिली.

 
अपघातात मृत्यूप्रकरणी
वाहन चालकाविरुद्ध गुन्हा

सोलापूर : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटील ऑटोमोबाईल्सजवळून एक गॅस टॅंकर हैदराबाद कडे जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने आलेले चारचाकी वाहन त्या टॅंकरला मागून धडकले. या अपघातात वाहनचालक शशिकांत काशिनाथ शिंगाडे (रा. होटगी स्टेशन, ता. दक्षिण सोलापूर) हा स्वतः जखमी झाला. तर या अपघातात चारचाकीत मागील शेतावर बसलेले प्रवीण जयसिंग रजपुत यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे ही गंभीर जखमी झाले. अपघातात त्या चारचाकी वाहनाचे एक लाख रुपयांचे तर गॅस टॅंकरचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भरतसिंह बनेसिंह परमार (रा. कासरी जि. रायगड ब्यावरा, मध्यप्रदेश) यांनी फौजदार चावडी पोलिसांत वाहनचालक शशिकांत शिंगाडेविरुद्ध फिर्याद दिली आहे. प्रवीण रजपूत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी शिंगाडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नवीन मल्लिकार्जुन नगरात चोरी
सोलापूर : अक्कलकोट रोडवरील नवीन मल्लिकार्जुन नगरातील अरमान रेसिडेन्सी येथील सोहेल अहमद जगेश मुल्ला यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील 52 हजार रुपयांची रोकड आणि 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान, फिर्यादी सोहेल मुल्ला हे घराला कुलूप लावून शेळगी, मित्र नगर भागात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातून पैसे व दागिने चोरल्याची फिर्याद मुल्ला यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

'महावितरण'च्या सहाय्यक अभियंत्यावर गुन्हा
सोलापूर : दक्षिण सदर बाजार हद्दीतील महादेव मंदिराच्या मागे करण्यासाठी मुजाहिद हनिफ शेख हा तरुण गेला होता. त्यावेळी त्याठिकाणी इलेक्‍ट्रिक पोलवरील विजेची तार खाली लोंबकळत होती. त्या तारेला चिकटून मुजाहिद याच्यासह तीन शेळ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 'महावितरण'च्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाल्याची फिर्याद मयत मुलाचे वडील इसाक शेख यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार महावितरणचे सहाय्यक अभियंता व्ही. बी. ऊबाळे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com