नाराज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माझी निवड : संजय पाटील 

Patil_NCP
Patil_NCP
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा मतदार संघासह सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून सुरेश घुले यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नाराज कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याची जबाबदारी देखील पंढरपूर तालुका पक्ष निरीक्षक म्हणून श्री. घुले यांनीच माझ्यावर दिली आहे, अशी माहिती जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा पंढरपूरचे पक्ष निरीक्षक संजय पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 

श्री. पाटील म्हणाले, गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेण्यासाठी व त्यांच्यातील नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांनी माझी नियुक्ती केली आहे. दरम्यान, काही विघ्नसंतोषी लोकांनी माध्यमांना चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आज झालेल्या बैठकीत या विषयावर देखील सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर झाला आहे. 

आगामी विधानसभेच्या पोटनिवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे आज बैठक झाली. बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येणारी विधानसभेची पोटनिवडणूक सर्व ताकदीनिशी लढवून पक्षाने दिलेला उमेदवार विजय करण्याचा निर्धार देखील या बैठकीत करण्यात आला. उद्या देखील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यांची मते व भावना जाणून घेऊन त्यांचा सविस्तर आहवाल पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे दिला जाणार आहे. 

पंढरपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही गट - तट नाहीत. सर्व कार्यकर्ते पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आजही खंबीपपणे उभे आहेत. विरोधकांनी हुरळून जाऊ नये, असा टोलाही संजय पाटील यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com