esakal | जिल्ह्यातील महत्त्वाच्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडी निश्‍चित !
sakal

बोलून बातमी शोधा

Natepute GP

सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांचन लांडगे तर उपसरपंचपदी अतुल पाटील यांच्या निवडी निश्‍चित झाल्या आहेत. 

जिल्ह्यातील महत्त्वाच्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडी निश्‍चित !

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांचन लांडगे तर उपसरपंचपदी अतुल पाटील यांच्या निवडी निश्‍चित झाल्या आहेत. नातेपुते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वचे सर्व 17 सदस्य सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास आघाडीतून निवडून आले आहेत. 

या गटातील सर्व नेत्यांच्या निर्णयानुसार प्रभाग क्रमांक दोनमधून विजयी झालेल्या कांचन लांडगे यांची सरपंचपदी निवड निश्‍चित झाली असून, त्यांचे शिक्षण दहावी पास आहे. माहेर फलटण आहे. 

प्रभाग तीनमधून विजयी झालेले अतुल पाटील यांची उपसरपंचपदी निवड निश्‍चित झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. अतुल पाटील हे कृषी पदवीधर असून, त्यांनी यापूर्वी 2010 ते 2015 या काळात उपसरपंचपद भूषवले आहे. पाटील कुटुंबातील कृष्णाजी हरजी पाटील हे उपसरपंच होते, तसेच त्यांचे वडील माजी पोलिस पाटील राजेंद्र हनुमंतराव पाटील यांनीही उपसरपंचपद भूषविले होते. 

नातेपुते गावचे होऊन गेलेले सरपंच पुढीलप्रमाणे... 
1933 ते 1945 कै. भोजराव संभाजीराव देशमुख ,1945 ते 1967 कै. भास्कर महादेव उराडे, 1967 ते 1978 कै. मुधोजीराव भोजराव तथा नानासाहेब देशमुख, 1978 ते 1984 कै. रघुनाथ गेनबा उराडे, 1984 ते 1990 कै. नानासाहेब देशमुख ,1990 ते 1993 कै. रामचंद्र नागनाथ भांड, 1993 ते 95 शिवाजीराव भोजराव देशमुख, 1995 ते 2000 सुरेखा राजकुमार उराडे,2000 ते2002 कमल जालिंदर ठोंबरे, 2002 ते 2005 सुवर्णा संपतराव पांढरे, 2005 ते 2010 महावीर बाबा साळवे, 2010 ते 2011 बाबाराजे देशमुख, 2011 ते 13 अमरशील देशमुख, 13 ते 2015 ऍड. रावसाहेब पांढरे, 2015 ते 2020 ऍड. भानुदास यशवंतराव राऊत. 

होऊन गेलेले उपसरपंच पुढीलप्रमाणे... 
कृष्णाजी हरजी पाटील, नानासाहेब देशमुख, डॉ. रतनचंद फुलचंद दोशी, नारायण अण्णा काळे, राजेंद्र हनुमंत पाटील, वामनराव दामोदर पलंगे, भीमराव आण्णा पांढरे, जितेंद्र चंद्रकांत पलंगे, चंद्रशेखर नागनाथ भांड, धैर्यशील मुधोजीराव देशमुख, चंद्रकांत शंकरराव ठोंबरे, अतुल राजेंद्र पाटील, सुनंदा राजेंद्र उराडे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top