esakal | ज्येष्ठ नाट्य कलावंत, दिग्दर्शिका शोभा बोल्ली यांची राज्य नाट्य परीक्षण समितीवर निवड ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Shobha Bolli.

ज्येष्ठ नाट्य कलावंत, दिग्दर्शिका शोभा बोल्ली यांची नाट्यनिर्मिती संस्थांना नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत नाट्य परीक्षण समिती (व्यावसायिक संगीत प्रायोगिक), मुंबईवर निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून 22 जानेवारी रोजी त्यांना याबाबत अधिकृत पत्र मिळाले. 

ज्येष्ठ नाट्य कलावंत, दिग्दर्शिका शोभा बोल्ली यांची राज्य नाट्य परीक्षण समितीवर निवड ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ज्येष्ठ नाट्य कलावंत, दिग्दर्शिका शोभा बोल्ली यांची नाट्यनिर्मिती संस्थांना नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत नाट्य परीक्षण समिती (व्यावसायिक संगीत प्रायोगिक), मुंबईवर निवड झाली आहे. महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून 22 जानेवारी रोजी त्यांना याबाबत अधिकृत पत्र मिळाले. त्याअंतर्गत व्यावसायिक प्रायोगिक नाट्यनिर्मिती अनुदान योजनेअंतर्गत नाटकांचा दर्जा ठरविण्यासाठी ही नाट्य परीक्षण समिती गठीत करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये शोभा बोल्ली यांच्यासह शफाहत खान, वनिता पिंपळखरे, अशोक समेळ, पुरुषोत्तम बेर्डे यांसारखी निवडक नाट्यक्षेत्रातील रंगकर्मींची निवड करण्यात आली आहे. एकूण 22 सदस्यांची ही समिती आहे. 

शोभा बोल्ली या ज्येष्ठ नाट्य कलावंत व दिग्दर्शिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या कार्याचा हा आलेख 

 • साधारण चाळीस वर्षे नाट्यक्षेत्रात भरीव योगदान 
 • शेकडो नाट्य प्रयोगांचे सादरीकरण 
 • महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक व अंतिम फेरीत अनेक वेळा रौप्यपदक 
 • अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य यासाठी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त 
 • मैत्र या दिवाळी अंकाचे गेल्या दहा वर्षांपासून संपादन 
 • मराठी चित्रपटसृष्टी तसेच अनेक कलावंत आणि साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या 
 • अनेक वर्तमानपत्रांतून स्थानिक व राज्यस्तरावर लेखन 
 • कविता तसेच अभिवाचनाचे सातत्याने प्रयोगशील सादरीकरण 
 • राज्य नाट्य तसेच अनेक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांना परीक्षक म्हणून कार्य 
 • वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीवर विविध कार्यक्रमांची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण तसेच वृत्त निवेदिका म्हणून कार्य 

काही विशेष प्रयोग... 

 • "तो मी नव्हेच' (प्रभाकर पणशीकर यांच्यासमवेत चन्नाक्का ही भूमिका - 25 प्रयोग) 
 • "गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट' या नाटकाचे 57 प्रयोग. पुणे, गोवा, मुंबई अशा अनेक ठिकाणी विविध महोत्सवात सादरीकरण 
 • "शांतता कोर्ट चालू आहे', "काळोख देत हुंकार', "नाटककाराच्या शोधात सहा पात्रे' अशा अनेक नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन 
 • पुणे मराठी ग्रंथालय तसेच लायन्स क्‍लबचा पुरस्कार प्राप्त 
 • अ. भा. म. नाट्य परिषद, मुंबईचा "शांता आपटे' हा मानाचा पुरस्कार प्राप्त 
 • साहित्य, नृत्य, नाट्य, संपादन, लेखन, सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखती अशा अनेक क्षेत्रांत अभ्यासपूर्ण संचार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image