कृषी मंत्र्यांचे याकडे आहे का लक्ष?; कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ‘असा’ येतोय मेसेज

Server down the website of the Department of Agriculture Government of Maharashtra
Server down the website of the Department of Agriculture Government of Maharashtra

सोलापूर : सध्या प्रत्येक विभाग पेपरलेस होत आहे. त्यात कृषी विभाग सुद्धा मागे नाही. शेतकऱ्यांची लाभ घेण्याची प्रत्येक योजना आता ऑनलाईन होत आहे. सरकारचा भरही सध्या ऑनलाईनवर आहे. मात्र, सरकाच्या विभागच यामध्ये कमी पडत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाचे संकेतस्थळ ओपन होत नसल्याने माहिती कशी घ्यायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीकडे पाहिले जाते. या शेतकऱ्यांच्या अनेक योजनांच्या लाभासाठी सरकार ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करत आहे. मात्र याची माहिती घेण्यासाठी सर्व्हच सुरु नसल्याचे चित्र आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरु झाला असून शेतकरी बी- बीयांणांसह विविध योजनेचा लाभ व्हावा म्हणून संकेतस्थळाचा आधार घेत आहे. मात्र, संकेतस्थळ ओपन होत नाही. त्यामुळे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कृषीमंत्री भुसे यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना वर्ष २०२०- २१ ते २०२२-२३ वर्षासाठी मान्यता दिली आहे. ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असल्याचे त्यांनी सांगितले असून या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

मृग बहरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरु, लिंबू व चिकू या फळपिकांसाठी १८ जिल्ह्यांमध्ये तर आंबिया बहरामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू सात पिकांसाठी २३ जिल्ह्यांमध्ये, स्ट्रॉबेरीसाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यात योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकापूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. मृग बहाराच्या मोसंबी व चिकू पिकासाठी ३० जून, संत्रा पिकासाठी २० जून (मृग २०२० साठी), पेरू पिकासाठी १४ जून (मृग २०२१ व २०२२), डाळिंब पिकासाठी १४ जुलै अशी अंतिम मुद देण्यात आली आहे. आंबिया बहारमधील द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, मोसंबी व केळीसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, काजू आणि कोकणातील आंबा पिकासाठी ३० नोव्हेंबर, इतर जिल्ह्यातील आंबा पिकासाठी आणि डाळींबासाठी ३१ डिसेंबर, स्ट्रॉबेरीसाठी १४ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असणार आहे. याची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर जात आहेत. मात्र, संकेतस्थळ ओपन होत नसल्याची तक्रार करत आहेत.

काय येत आहे मेसेज
महाराष्ट्र सरकारचे कृषी विभाग हे संकतेस्थळ ओपन केल्यानंतर ‘सर्व्हर दोष! सर्व्हरमध्ये तात्पुरता दोष उद्‌भवला आहे. त्यामुळे आपली विनंती पूर्ण होऊ शकत नाही. कृपया काही मिनीटानंतर प्रयत्न करा. तुमच्या समोर अजूनही हा दोष उद्‌भवत असल्यास कृपया सिस्टीम ॲडमिनिस्टेटला त्याबाबत कळवा.’ या संकेतस्थळावर एक कोटी सहा लाख ८४ हजार ९२३ जणांनी भेट दिली आहे. त्यात आज चार हजार ८५७ जणांनी भेट दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com