Solapur News : ताजमहाल पाहायला निघाला अन्‌ सोलापुरात भरकटला

राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी लतीफ अन्सारी हा अंदाजे चाळीस वर्षीय प्रवासी ताजमहाल पाहण्यासाठी घराबाहेर पडला; मात्र प्रवासात भरकटत तो सोलापुरात येऊन पोहोचला.
Latif Ansari

Latif Ansari

sakal

Updated on

सोलापूर - राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी लतीफ अन्सारी हा अंदाजे चाळीस वर्षीय प्रवासी ताजमहाल पाहण्यासाठी घराबाहेर पडला; मात्र प्रवासात भरकटत तो सोलापुरात येऊन पोहोचला. सम्राट चौकातील एका पडक्या इमारतीत तो महिनाभराहून अधिक काळ एकटाच राहात होता. संभव फाउंडेशनचे अतिश लक्ष्मण यांच्या पुढाकारामुळे त्याला आता महापालिकेच्या निवारागृहात आसरा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com