
सोलापूर : ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आयुष्यभर जिवापाड प्रेम करेन, आपण लग्न करू’ असे म्हणून एका तरुणाने २० वर्षीय तरुणीशी जवळीक साधली. फेब्रुवारीमध्ये तिच्यावर इच्छेविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतर वारंवार घरी कोणी नसताना शरीरसंबंध केले आणि त्यातून तरुणी गरोदर राहिली. तिने विवाहासाठी विचारल्यावर टाळाटाळ करून तो तरुण पसार झाला आहे. पीडितेने सोमवारी (ता. ४) मध्यरात्री एमआयडीसी पोलिसांत धाव घेत तरुणाविरुद्ध फिर्याद दिली. पोलिस त्या तरुणाचा शोध घेत आहेत.