शैला गोडसे म्हणाल्या, शिवसेनेची कारवाई मी जड अंत:करणाने स्वीकारत आहे, मात्र अपक्ष उमेदवारी कायम ठेवणार !

Godse Prachar
Godse Prachar
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकच उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे संधी मिळणे अशक्‍य होती. तरीही मी उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणून शिवसेनेने माझ्यावर कारवाई केली. ती कारवाई मी जड अंत:करणाने स्वीकारत आहे. मात्र, जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे, असे पंढरपूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शैला गोडसे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी आपली प्रचार मोहीम तीव्र केली आहे. 

शैला गोडसे म्हणाल्या, की पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून मतदारसंघातील प्रश्न हाताळत होते. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये ही जागा भाजपने रयत क्रांती पक्षाला सोडल्यामुळे दाखल अर्ज माघार घ्यावा लागला. तरीही मतदारसंघात मंगळवेढा उपसा सिंचन योजना व भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी त्यांना सातत्याने पत्रव्यवहार चालू होता. याशिवाय उजनी व भाटघरच्या कालव्यातील पाण्यासाठी देखील पत्र व्यवहार व संघर्ष सुरू होता. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीत पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली होती. परंतु या मागणीबद्दल कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मतदारसंघातील जनता माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. 

त्या पुढे म्हणाल्या, जनतेने, ताई तुम्ही अर्ज भरा असा आग्रह केल्यामुळे मी अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर मला अर्ज माघारी घ्या अशी विनंती वरिष्ठांकडून करण्यात आली. परंतु मी निवडणूक मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जनतेतून मला सातत्याने पाठबळ मिळत गेले. मी मंगळवेढा, मोहोळ व पंढरपूर या तीन तालुक्‍यांमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. जे प्रश्न आमदार, खासदार यांच्या पातळीवरच्या आहेत ते सोडण्यासाठी त्या पातळीवरच जावे लागते म्हणून मी पहिल्यांदा जनतेच्या आग्रहास्तव आमदार होण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु माझा शेवटचा लढा देखील या भागात मतदार संघातील सर्वसामान्य, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे.

समोर उभे असलेले उमेदवार हे घराणेशाही लाभलेले आहेत. शिवाय साखर कारखानदार असल्यामुळे त्यांच्यावर ऊस उत्पादकांची नाराजी आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला म्हणून या मतदारसंघातील जनतेसमोर जात आहे आणि जनतेचा कौल विचारात घेता त्यांच्याच आग्रहास्तव मी माझा उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यावर ठाम आहे. 4 तारखेला मतदारसंघातील जनतेसमोर मी माझा जाहीरनामा ठेवणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com