

Shaktipith Mahamarg Land Survey Sparks Farmers Protest In Avhe Administration Conducts Survey Under Police Security
sakal
करकंब : ‘आम्हाला बेघर करू नका हो, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका हो,’ असे म्हणत पदर पसरून आक्रोश करणाऱ्या महिलांकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने मंगळवारी आव्हे (ता. पंढरपूर) येथे शक्तिपीठ महामार्गासाठी जबरदस्तीने जमीन मोजणी केली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे बाधित शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.