Solapur : सोलापूरच्या शांभवी म्हेत्रेने बॅडमिंटन स्पर्धेत आतापर्यंत राष्ट्रीयस्तरावर विविध पदके प्राप्त करत बॅडमिंटनमध्ये गरुड झेप घेतली आहे. .शांभवी सध्या कुंभारी येथील अश्विनी रूरल मेडिकल महाविद्यालयात इंटर्नशिप करत आहे. इंटर्नशिप सांभाळत ती आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवीत सोलापूरच्या खेळाडूंसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. एमबीबीएस अभ्यासासोबत खेळातही आई-वडिलांचे नाव उज्वल करण्याचे स्वप्न असल्याचे शांभवीने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले..Locomotive Pilots : लोको पायलटांच्या अडचणी वाढल्या, रेल्वेतील रिक्त जागांमुळे ७२ तास घराबाहेर राहावे लागते.शांभवीने वयाच्या दहाव्या वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील सांगवी गावात बॅडमिंटन खेळाला खेळण्यास सुरवात केली. सध्या ती सोलापुरात प्रशिक्षणाचे धडे घेत असून प्रशिक्षक अर्शद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा सराव करत आहे. जिल्हा व राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत पदके प्राप्त करत आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाबरोबर भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय असल्याची तीने यावेळी सांगितले..विविधस्तरावर पदकांची कमाईशहरातील रेल्वे मैदानावरील बॅडमिंटन कोर्टवर सध्या ती सहा तास खेळाचा सराव करत आहे. भविष्यातील मोठ्या स्पर्धेत अधिका-अधिक सराव वाढवणार असून खेळातील प्रोत्साहन तसेच खेळातील सातत्य यासाठी कुटुंबातील सदस्यांचे नेहमीच पाठिंबा मिळत आहे. यामध्ये आई वैशाली म्हेत्रे तर वडील शंकरराव म्हेत्रे यांनी प्रोत्साहन दिले असल्याचे सांगितले.शांभवी म्हेत्रेने विविधस्तरावरील स्पर्धेत आतापर्यंत एकूण २६ विविध पदके प्राप्त केली आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर १५ तर राज्यस्तरावर ८ पदके तर राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत ३ पदके प्राप्त करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे..बॅडमिंटन खेळातील आवडीमुळे वयाच्या दहाव्या वर्षांपासून खेळाचा सराव करत आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत यश प्राप्त करावे असे आईचे स्वप्न असून ते स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी मी रेल्वे मैदानात खेळाचा सराव करत आहे. प्रशिक्षकांच्या माध्यमातून मिळणारे प्रशिक्षण आणि आई-वडिलांचा पाठिंबा यामुळे निश्चित मी यश संपादन करेन हा विश्वास आहे.- शांभवी म्हेत्रे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.