Dattatray Ghadge innovative mango farming
esakal
मोडनिंब : अरण (ता. माढा) येथील आंबा उत्पादक शेतकरी दत्तात्रेय घाडगे यांनी विकसित केलेल्या 'शरद आंबा' या झाडांची लागवड गोविंद बागेत करण्यात आली. जवळपास तीन किलोहून अधिक वजनाच्या आंब्याचे उत्पादन या विकसित वाणातून घेतले जाते. दत्तात्रेय घाडगे यांनी बुधवारी या विकसित वाणाची रोपे बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेट (Sharad Pawar Sharad Mango variety) दिली. यावेळी श्री. पवार यांनी या रोपांची श्री. घाडगे यांच्या हातूनच लागवड केली.