
सोलापूर : इयत्ता चौथीत शिकत असल्यापासून उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वाटंबरे (ता.सांगोला) येथील शार्दूल पवार या २४ वर्षीय तरुणाने शिवसुधा मिल्क व ॲग्रो प्रोसेसिंग हा दूग्ध प्रक्रिया उद्योग उभारला आहे.
वाटंबरे (ता.सांगोला) येथील शार्दूल पवार हा तरुण कृषी पदवीधर आहे. घरात वडिलांचा डेअरीचा व्यवसाय आहे. पण चौथीपासून उद्योगच करायचा हे स्वप्न पाहतच शार्दूल यांनी विविधप्रकारे उद्योजकतेचे प्रयत्न सूर केले.
दहावीला असताना शार्दूलने काही बिझनेस प्रकल्प तयार केले होते. पण दहावीची परीक्षा पंधरा दिवसावर आल्याने घरच्यांनी आधी परीक्षेची तयारी करण्याचे सांगितले. मग शार्दूल पुन्हा अभ्यासाला लागला.
बारावीनंतर त्याने बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण सुरु केले. पुन्हा उद्योग निर्मितीच्या प्रोजेक्टची संधी शार्दूलला मिळाली. त्याने अंतिम वर्षापर्यंत स्वतःच्या उद्योग उभारणीची तयारी सुरु केली. नंतर त्याने एमबीएला ॲडमिशन घेतले.
त्यापैकी मिल्क प्रोसेसींगचा प्रोजेक्टचे ॲनॅलिसिस करून तो उभारण्याचे ठरवले. मुळात एमबीए करत असताना शार्दूलला पुण्यात नोकरी लागली होती. शार्दूलने नोकरी सोडून मिल्क प्रोसेसिंग उद्योग उभारण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने सहा महिने कुटुंबीयांना समजावून सांगत अखेर उद्योगाची निर्मिती सुरु केली.
जिल्हा उद्योग केंद्राने त्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे ठरवले. बॅंक ऑफ महाराष्ट्राने त्यास मदत केली. दुग्धजन्य उत्पादनांचा शिवसुधा प्लांट त्याने उभा केला. एकीकडे प्लांट उभा होत असताना त्याने मार्केटिंगची तयारी सुरु केली.
घरोघरी उत्पादनाचा प्रसार करत बाजारात उत्पादनांची मागणी निर्माण झाली. त्या मागणीनुसार पुरवठा सुरु झाला. ग्राहकांनीच उत्पादनांची गुणवत्ता ओळखल्याने पुरवठ्याचा मार्ग सरळ मोकळा झाला. आता उत्पादने बाजारात आली आहेत.
ठळक बाबी
- इयत्ता चौथीपासून उद्योजकतेची जपली आवड
- दहावीला उद्योगाची केली आखणी
- पदवी अखेरीस ५७ उद्योग अहवालाची निर्मिती
- पुण्याची नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचा निर्णय
- एकूण १५ दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती
- उद्योगातून २२ जणांना रोजगार
- आठ टन क्षमतेचा उभारला उद्योग
स्टार्टअपमधून विकसित केलेली मूल्ये
- उद्योग उभारणीसाठी स्वतःच केलेला प्रकल्प अहवाल
- बाजारात आधी उत्पादनांची मागणी निर्माण करून मग पुरवठा
- ग्राहक ते व्यापारी हा मार्केटींगचा प्रवास
माझ्या उद्योगाची प्रेरणा सर्वस्वी माझे वडीलच आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायिकतेचा अनुभव मला दिला. लवकरच दूरच्या बाजारपेठांमध्ये उत्पादने पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
- शार्दूल पवार, संचालक, शिवसुधा मिल्क ॲण्ड ॲग्रोप्रोसेसिंग, वाटंबरे (ता.सांगोला)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.