

Solapur Tragedy: Dead Bodies of Two Missing Rajasthani Artisans Recovered from Ujani Canal
Sakal
मोहोळ : ढोक बाभुळगाव ता मोहोळ येथील उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेले फरशी बसविणारे कारागीर वाहून गेले होते. अखेर रविवार ता 17 रोजी त्यांचे मृतदेह काल०याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. पोलीस प्रशासनाने व गावकऱ्यांच्या मदतीने ते मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदना साठी मोहोळ ला पाठवून ते त्यांच्या मूळ गावी रवाना केल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.