"उजनीतून बारामतीला पाणी देऊनही शरद पवारांना कमी पडतंय !'

शिवसेना आमदार शहाजी पाटील यांचा ठाकरे सरकारला इशारा
Patil_Pawar
Patil_PawarCanva

पंढरपूर (सोलापूर) : उजनी धरणातील (Ujani Dam) पाण्यावरून सोलापूरचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भाजप आमदारांनी (BJP MLAs) सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच, आता शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shiv Sena's Sangola MLA Shahaji Patil) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला नेले तर सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन केले जाईल, असा थेट इशारा राज्यातील ठाकरे सरकारला दिला आहे. उजनीच्या पाण्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. (Shiv Sena MLA Shahaji Patil warns Thackeray government)

उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांसाठी योजनेस ठाकरे सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच कळीच्या मुद्द्यावरून आज सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी शरद पवार यांच्यावर उजनीच्या पाण्यावरून जोरदार टीकास्त्र सोडत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Patil_Pawar
लॉकडाऊनच्या नावाखाली 32 रुपयांवरून 22 रुपयांवर आले दुधाचे दर

उजनीचे पाणी इंदापूरला नेण्यास उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दीपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर आज पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चिकमहूद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगीनाद आंदोलन केले. या वेळी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍याला पाच टीएमसी पाणी देण्यास आपला तीव्र विरोध असल्याचे सांगितले.

Patil_Pawar
तरुण ठरताहेत कोरोनाचे बळी ! 17120 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

या वेळी आमदार पाटील म्हणाले, उजनीचे पाणी इंदापूरला मंजूर करताना जिल्ह्यातील एकाही आमदाराला विश्वासात घेतले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आघाडी सरकारने अन्याय केला आहे. अशा पद्धतीचा सरकारने निर्णय घेतला तर आम्ही रक्तरंजित लढाई करू, असा इशारा आमदार पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

राज्यात ज्या- ज्या वेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या विचारांचे सरकार आले तेव्हा तेव्हा त्यांनी फक्त बारामतीचाच विकास केलेला आहे. राज्यातला सगळा निधी बारामतीला वळवून न्यायचा आणि बारामती हे विकासाचं मॉडेल आहे, असं सगळ्या देशभर सांगत फिरायचं, ही पवारांची राजकीय पद्धत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक या नेत्यांनी नेहमी राज्याचा विकास पाहिला; मात्र पवारांनी फक्त बारामतीचा विकास केल्याचा आरोप आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे.

शरद पवार यांनी उजनी धरणातून बारामती एमआयडीसी, बारामती शहर आणि सिनर्मास प्रकल्पाला पाणी नेलं. एवढं पाणी देऊनही जर शरद पवारांना पाणी कमी पडतंय असं वाटत आहे. उजनी धरणच पुणे जिल्ह्यात वळवण्याची काय यंत्रणा असती तर ते धरणसुद्धा शरद पवारांनी त्यांच्या भागात नेलं असतं, अशी जोरदार टीका आमदार शहाजी पाटील यांनी केली आहे

येत्या काळात उजनी धरणाच्या पाण्यावरून पवार विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com