
सोलापूर : कर्जमाफीच्या मुद्यावरुन शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कृषी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिला आहे. मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनादरम्यान करण्यात आली.