गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामा !

गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामा! पदाधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे
गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामा
गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामाSakal
Updated on: 
Summary

शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गटबाजी असून, या गटबाजीला कंटाळून आपण शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे भरत आवताडे यांनी सांगितले.

करमाळा (सोलापूर) : शिवसेनेचा (Shiv Sena) उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करत असताना संघटनेकडून कधी विचारात घेतले गेले नाही. तसेच शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याने या गटबाजीला कंटाळून आपण शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे भरत आवताडे (Bharat Awtade) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामा
विवाहितेचा खून : 24 तासात संशयिताच्या आवळल्या मुसक्‍या

भरत आवताडे म्हणाले, शिवसेना पक्षाचा कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर आपल्या पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होत असल्यामुळे पक्षवाढीसाठी कुठल्याही प्रकारचे काम न करता आल्यामुळे करमाळा तालुक्‍यात शिवसैनिकांची अवस्था बिकट झाली आहे. शिवसेनेचा नेता कोण, हे कोणालाही सांगता येत नाही. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भवनमधून सोलापूर जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष यांना मुंबईला मीटिंगसाठी बोलावले असताना जिल्हाप्रमुखांनी, करमाळ्यातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत आम्हाला सांगितले नाही. आम्हाला विचारात घेतले नाही.

इंधन दरवाढीच्या विरोधात जेव्हा आंदोलन झाले. त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली. पक्ष ज्याला विधानसभेची उमेदवारी देईल त्याचे काम करायचे, असे असताना शिवसेनेची उमेदवारी रश्‍मी बागल यांना मिळाली. आम्ही पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला एकनिष्ठेने काम केले. मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी विधानसभेला बंडखोरी करून विरोधात असणाऱ्या उमेदवाराचा प्रचार केला. सध्याच्या परिस्थितीमध्ये आज तेच लोक राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आम्हाला डावलून पक्षाचे अधिकृत पद नसतानाही स्वतः पद असल्याचे सांगून पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत. त्यांना पक्षाशी काही देणे-घेणे नाही.

गटबाजीला कंटाळून शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा राजीनामा
आजपासून 'एसटी' प्रवास महागणार! डिझेल दरवाढीचा परिणाम

माझ्या शिवसेनेच्या कारकिर्दीत कोरोना महामारीच्या काळामध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्याचा महायज्ञ म्हणून शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम घेण्यात आले. आम्ही इमानेइतबारे काम करून सुद्धा शिवसेनेचे इतर पदाधिकारी मात्र आमच्याबरोबर निष्ठेने काम न करता विरोधात काम करत आहेत. तालुक्‍यात कुठलेही प्रकारचे संघटन नाही, असेही आवताडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Marathi News Esakal
www.esakal.com