सोलापुरातील अधिकाऱ्यांच्या मदतीला पी. शिवा शंकर, अशोक पाटील

Shiva Shankar and Ashok Patil with the help of Solapur officials
Shiva Shankar and Ashok Patil with the help of Solapur officials
Updated on: 

सोलापूर : सोलापूर शहरात नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही केल्या कमी होत नाही. सोलापुरात सध्या कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने पी. शिवा शंकर व अशोक पाटील या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे दोन्ही अधिकारी आज सायंकाळी सोलापुरात दाखल झाले असून त्यांनी सोलापुरातील कोरोनाची स्थिती व उपायोजना याबाबतची माहिती घेतली. 
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा एम. डी. शिवाशंकर व म्हाडाच्या पुणे विभागाचे सीईओ अशोक पाटील या दोघांची सोलापूरचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी. शिवा शंकर यांनी यापूर्वी परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अशोक पाटील हे अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील आहेत. सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची स्थिती,  जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना या बाबतचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर हे उद्या (मंगळवारी) सोलापूरच्या दौऱ्यावर येणार असून सकाळी 11 वाजता सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी बैठक आयोजित केली असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. 

प्रवीण गेडाम यांचे ट्‌विट
सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी अथवा सोलापूरचे विशेष अधिकारी म्हणून प्रवीण गेडाम यांची नियुक्ती होणार अशी चर्चा आज दिवसभर सोलापूर जिल्ह्यात होती. ही सर्व चर्चा निरर्थक असून आपण सध्या दिल्ली येथे केंद्र सरकारमध्ये सेवेत असल्याचे ट्वीट प्रवीण गेडाम यांनी करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com