
सोलापूर : हद्दवाढ भागातील विजयपूर रोडवरील अशोक नगर येथील जलतरण तलाव अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे खेळाडू अन् स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला तलाव दुरवस्थेत असल्याने ते पैसे केवळ दुर्लक्षामुळे वाया गेल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने या कोरड्या तलावात पोहून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.