मोहोळ - पेनुर, ता. मोहोळ येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, खा. उदयनराजे भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली खा. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजू खरे यांच्या उपस्थितीत बुधवार ता. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी दिली.
मोहोळ- पंढरपूर- आळंदी पालखी मार्गा लगत हा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले आहे, तर स्मारकाचा इतर खर्च जिल्हाप्रमुख चवरे यांनी केला आहे. अगदी बसमध्ये तसेच इतर वाहनात बसूनही जाताना या अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन होत आहे, तसेच एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे.
लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, माजी सरपंच रमेश माने, सरपंच सुजित आवारे, उपसरपंच मयुरी चवरे, पैलवान बाळासाहेब चवरे व ग्रामविकास अधिकारी नागनाथ माने उपस्थित राहणार आहेत. या नेत्र दीपक सुवर्ण सोहळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख चवरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.