Tense atmosphere in Pandharpur after two separate suicide cases occurred in a single day.Sakal
सोलापूर
Solapur : तरुण अन् अल्पवयीन मुलीने संपवले जीवन; पांढरी येथे एकाच दिवशी दोन घटना घडल्याने खळबळ, नक्की काय कारण?
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये समर्थ ऊर्फ बाळू दत्तात्रय लोंढे (वय २०) व आरती दीपक कसबे (वय १७, दोघेही रा. पांढरी) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पांगरी : बार्शी तालुक्यातील पांढरीत साेमवारी एका तरुणाने व अल्पवयीन मुलीने काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये समर्थ ऊर्फ बाळू दत्तात्रय लोंढे (वय २०) व आरती दीपक कसबे (वय १७, दोघेही रा. पांढरी) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

