तपासात धक्कादायक माहिती उघड! आधी माहिती घेतली, कट रचला, सकाळची वर्दळ, लपायला जागा, अरुंद रस्त्याची जागा निवडली अन्‌ केला खून; ६ जणांना ४ दिवस पोलिस कोठडी

जुन्या वादातून सहा जणांनी कट रचून सुरेश कृष्णा श्रीराम (रा. रफिक नगर, एमआयडीसी, सोलापूर) याचा भर रस्त्यात आडवून खून केला. पत्नी लक्ष्मी श्रीराम यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली. सोमवारी (ता. ४) त्यांना न्यायालयाने हजर केले. न्यायालयाने सर्वांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.
solapur murder

solapur murder

sakal

Updated on

सोलापूर : जुन्या वादातून सहा जणांनी कट रचून सुरेश कृष्णा श्रीराम (रा. रफिक नगर, एमआयडीसी, सोलापूर) याचा भर रस्त्यात आडवून खून केला. पत्नी लक्ष्मी श्रीराम यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली. सोमवारी (ता. ४) त्यांना न्यायालयाने हजर केले. न्यायालयाने सर्वांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. संशयित आरोपींनी अरुंद रस्ता, रस्त्यावरील मोठी वर्दळ, आजूबाजूला लपायला जागा असलेले ठिकाण खुनासाठी निवडले होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

मयत सुरेश श्रीराम याला संशयित आरोपींनी (सुगडा वगळता बाकीचे) काही वर्षांपूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हा खटला आता न्यायालयात सुनावणीसाठी तथा बोर्डावर आला होता. ती केस मागे घे म्हणून संशयित आरोपी सुरेशवर दबाव टाकत होते, पण तो केस मागे घेत नव्हता. त्या रागातून विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा आण्णा रेड्डी, करण अशोक श्रीराम, सुमीत अशोक श्रीराम, राहुल बसप्पा आण्णा रेड्डी यांनी सुरेशला जीवे ठार मारण्याचा कट रचला.

घटनेपूर्वी त्यांनी सुरेशची दिनचर्या जाणून घेतली. दररोज सकाळी तो अशोक चौकातील जीमला जात होता. तो घरी जाताना ७० फूट रोडवर त्याला कोठे आडवून खाली पाडायचे आणि त्याच्यावर हल्ला करायचा हे ठिकाण निश्चित केले होते. दरम्यान, आता या खुनाच्या गुन्ह्यात आणखी कोण सूत्रधार आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत तपास करीत आहेत.

सुभाष सगडाने हत्याराला लावली धार

सुरेश श्रीराम याच्या खून खटल्यात सुभाष सुगडा हा अटकेत आहे. तो संशयित आरोपींच्या संपर्कातील व्यक्ती आहे. खुनात संशयित आरोपींनी वापरलेल्या हत्यारांना सुगडा याने धार लावून दिल्याची बाब समोर आली आहे. संशयितांनी सुभाष सुगडा यास काय सांगून हत्यारास धार लावून घेतली, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com