
लवंग : माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील गणेशगाव येथे आज (शुक्रवारी) पहाटे एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने शांतताप्रिय गणेशगाव व आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.